Next

Few Tips to Prevent Yourself From Alzheimer's | अल्झायमर पासून बचाव करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 10:38 AM2020-10-16T10:38:44+5:302020-10-16T10:39:17+5:30

अल्झायमर हा प्रामुख्याने वार्धक्यामध्ये होणारा आजार आहे. सोप्या भाषेत विसरभोळेपणा असा याचा अर्थ होतो. या आजाराच्या रूग्णामध्ये विपरित परिणाम होऊन हळूहळू पूर्ण स्मृतिभ्रंश म्हणजे विसरभोळेपणा होतो. अगदी आपल्या जवळच्या लोकांचे नाव विसरण्यापासून ते जेवण खाणे विसरणे इथपर्यंत हा आजार बळावतो. सतत स्ट्रेस मध्ये रहाणं, विचारात बसून राहणं, इत्यादी गोष्टी अलीकडे सगळेच करत असतात. पण कधीतरी या मुले मेंदूवर परिणाम देखील होऊ शकतो. या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय न घेऊ शकणे, बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे ही आहेत. रक्तदाब, मधुमेह, आधुनिक जीवनशैली आणि डोक्यावर जखम झाल्याने हा आजार होण्याची शक्यता वाढते.