मक्याच्या पिठाची बर्फी | Lokmat Superchef - Padmini Khedkar | Corn Flour Barfi Recipe | Lokmat Sakhi
 By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 16:31 IST2021-04-16T16:30:33+5:302021-04-16T16:31:12+5:30
मका म्हटले तर आपल्याला पावसाची आणि चौपाटीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मस्तपैकी चौपाटीवर बसून मका खाण्याची मजा काही औरच असते. आपल्याला जर कोणी मक्याच्या पिठाची बर्फी दिली तर आपण ती बर्फी खाण्यासाठी टाळाटाळ करू. पण आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ पद्मिनी खेडकर यांची चक्क मक्याच्या पिठाची बर्फी ही दिवाळी स्पेशल रेसिपी त्यांनी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर मग यंदाच्या दिवाळीला ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरीच मक्याच्या पिठाची बर्फी बनवू शकतात. ही रेसिपी बघून घरच्या घरी मक्याच्या पिठाची बर्फी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -