शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.