Next

'युतीविषयी बोलण्याचा अधिकार माझा, पण निर्णय ते तिघेच घेतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 02:18 PM2019-08-29T14:18:44+5:302019-08-29T14:19:25+5:30

नवी मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीवेळी युतीचा फॉर्म्युला तिघांनी (अमित शहा, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे) ठरविला होता. त्या बैठकीला ...

नवी मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीवेळी युतीचा फॉर्म्युला तिघांनी (अमित शहा, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे) ठरविला होता. त्या बैठकीला मी नव्हतो. मात्र, आता प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलण्याचा अधिकार मला आहे. पण, युतीचा निर्णय ते तिघेच घेणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अतिरिक्त मार्केटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)