Next

नवीन मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी |Gujarat DY.CM Nitin Patel Shed Tears | India

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 12:25 PM2021-09-14T12:25:30+5:302021-09-14T12:25:56+5:30

पहिल्यांदाच आमदार झालेला नेता हा गुजरात सारख्या राज्याचा मुख्यमंत्री होतो.. ही गोष्ट अनेकांना आश्चर्यचकीत करणारीच आहे. भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१७ मध्ये पहिल्यादांच ते आमदार झाले. त्याआधी ते नगरसेवक होते. आणि आता ते गुजरातचे मुख्यमंत्री झालेत. भाजपला गुजरातमध्ये 'पटेल' चेहरा हवा होता, म्हणूनच त्यांची निवड झाल्याचं अनेक जाणकार सांगतात. पण या सगळ्या घडामोडीत गुजरातचे उपमुख्यमंत्री मात्र नाराज झाल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेसुद्धा पटेल समाजातून येतात. ते अनुभवी आहेत, त्यांचा जनसंपर्क आहे. तेसुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पटेल समाजाचा नेता म्हणून तेच मुख्यमंत्री होतात की काय, अशी चर्चा होती. पण झालं वेगळंच.. त्यानंतर आता नितीन पटेल यांच्या मनातील वेदना अश्रुंमधून बाहेर पडल्या आहेत.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :गुजरातमुख्यमंत्रीनितीन पटेलGujaratChief MinisterNitin Patel