नाशिक जिल्हा परिषदेच्या सभेत गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 15:21 IST2018-10-08T15:02:54+5:302018-10-08T15:21:54+5:30
नाशिक - महिला व कल्याण विभागाच्या सभापती अर्पणा खोसकर यांना राज्यस्तरीय पोषण आहार पुरस्काराची कल्पना न देऊन अवमान केल्याचा ...
नाशिक - महिला व कल्याण विभागाच्या सभापती अर्पणा खोसकर यांना राज्यस्तरीय पोषण आहार पुरस्काराची कल्पना न देऊन अवमान केल्याचा आरोप करत उपाध्यक्ष नयना गावित यांनी महिला सदस्यांसह सभागृहात व्यासपीठासमोरील खुल्या जागेत बसून आंदोलन केले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी केली. अर्पणा खोसकर या आदिवासी व महिला सभापती असल्यानेच त्यांना अशाप्रकारे डावलण्यात आल्याचा आरोप ही नयना गावित यांनी केला आहे. यापूर्वी कृषी पुरस्कारांच्या वेळी आपल्या सोबतही प्रशासनाकडून असाच प्रकार करून अवमान करण्याचा प्रकार घडला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

















