नागपुरात नवनिर्माणाधीन रुग्णालयाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 16:43 IST2019-01-09T16:31:03+5:302019-01-09T16:43:20+5:30
शहरातील किंग्जवे भागात जुना परवाना भवनाच्या जागी उभारल्या जात असलेल्या किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला बुधवारी दुपारी अचानक आग लागली.
नागपूर - शहरातील किंग्जवे भागात जुना परवाना भवनाच्या जागी उभारल्या जात असलेल्या किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. या ठिकाणी अनेक मजूर काम करीत होते. आग लागल्याचे पाहताच सर्व मजूर तेथून निघण्यात यशस्वी झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.