Next

चित्रा वाघ आमदार होणार? राजकीय वर्तुळात चर्चा | Will Chitra Wagh become a MLA? Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 01:37 PM2021-11-18T13:37:25+5:302021-11-18T13:41:54+5:30

महाराष्ट्रात भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून चित्रा वाघ यांनी आपली ओळख निर्माण केलीय. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून वेळोवेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्याविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. अनेक प्रकरणात चित्रा वाघ यांनी ठोस भुमिका घेत शेवटपर्यंत मुद्दा लावून धरला.. मग ते पूजा चव्हाण प्रकरण असो की ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर झालेले आरोप असोत.. महिलाचे प्रश्न, महिला अधिकाऱ्यांची छळवणूक या मुद्द्यांवरही त्यांनी सरकार चांगलेच धारेवर धरलं. सोशल मिडीयावरही त्या चांगल्याच सक्रिय असतात. सरकारविरोधात बोलणाऱ्या एक विरोधी पक्षातील आक्रमक नेत्या म्हणून त्यांना ओळख जातं. त्यांचा हा आक्रमकपणा आणि सरकारला धारेवर धरण्याच्या भुमिकेमुळे चित्रा वाघ यांनी भाजपकडून नवी संधी मिळण्याची शक्यता आहे.