Next

पालिका का जमिनदोस्त करणार गिरणी कामगारांची घरं? Mill Workers Home In Mumbai | Girni Kamgar

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 01:23 PM2021-06-20T13:23:40+5:302021-06-20T13:24:11+5:30

महालक्ष्मी इथे सात रस्त्याजवळ प्रस्तावित पूल सागरी किनारा मार्गाला जोडण्यात येणार आहे. हा पूल केशवराव खाडये मार्गावरून जातो. इथेच मॉर्डन मिल कम्पाऊंड इथली १७ कुटूंबियांची चाळ पूलाच्या आड येतेय. त्यामुळे मुंबई महापालिकेने या चाळीला नोटीस दिलेय. ब्रिटीश काळात मॉडर्न मिलमधील कामगारांच्या राहण्यासाठी बोमेनजी पपेटी यांनी महालक्ष्मी इथे घरं बांधली. १९०२ सालच्या सुमारास सहा चाळी येथे उभारण्यात आल्या. पुढे १९३० सालच्या सुमारास इथे दुमजली इमारत बांधण्यात आली. इथल्या कामगार वसाहतीमध्ये १५६ कामगारांची कुटूंबे राहायत. पण आता सागरी किनारा प्रकल्पामुळे १७ कुटूंबे रस्त्यांवर येणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मुंबईउद्धव ठाकरेशिवसेनाMumbaiUddhav ThackerayShiv Sena