Next

उद्धव ठाकरेंच्या गैरजेरीत अजित पवार ऐवजी शरद पवार सक्रिय का झालेत? Sharad Pawar | Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 02:32 PM2021-11-25T14:32:19+5:302021-11-25T14:32:35+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात आहेत, या गोष्टीला आता ११ दिवस उलटून गेलेत... उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली... त्यानंतरही ते उपचारासाठी रुग्णालयात आहेत... अशात उपमुख्यमंत्री अजितदादा हे मुख्यमंत्र्यांच्या जागी सक्रिय होतील, असं वाटलं होतं... शिवाय मुख्यमंत्री रुग्णालयात जाताच, एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कारभार दिल्याच्या अफवाही उठल्या होत्या... या सगळ्या चर्चांमध्ये आता चर्चा होतेय, ती प्रभारी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत गेलेल्या शरद पवारांची... कारण या सगळ्या चर्चा आणि शक्यतांच्या पलिकडे शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत अॅक्टव्ह का झाले? हा अजितदादांवरचा अविश्वास आहे? की दादांकडे तात्पुरता कारभार गेल्यास, सेनेतेली संभाव्य अस्वस्थतेला टाळण्याचा प्रयत्न? या प्रश्नांवर या व्हिडीओतून बोलूयात..

 

टॅग्स :उद्धव ठाकरेUddhav Thackeray