Next

Gopichand Padalkar यांनी Anil Parabयांना Uddhav Thackeray यांच्या शब्दाची आठवण का करुन दिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 21:32 IST2022-01-11T21:32:01+5:302022-01-11T21:32:18+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही काही तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचं आंदोलन कायम आहे... या आंदोलनावरूनच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना गोड बोलून सुनावलंय... वरून पडळकरांनी अनिल परब यांना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दिलेल्या शब्दाची आठवण करून दिलेय... आणि किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा तरी मान राखा असं पडळकरांनी म्हटलंय..