Next

चंद्रकांत पाटील निरर्थक माणूस; म्हणूनच अजित पवार त्यांना वेळ देत नाहीत Ajit Pawar Chandrakant Patil

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 09:30 PM2022-01-11T21:30:46+5:302022-01-11T21:31:17+5:30

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात अनेकदा वाद रंगल्याचं दिसून आलय.. पहाटेच्या शपथविधीनंतर भाजपकडून काही महिने अजित पवारांवर टीका करणे बंद झाले होते..परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यायत... अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासोबतच पुण्याचे पालकमंत्री आहेत तर चंद्रकांत पाटील हे पुण्यातीलच कोथरूड मतदारसंघाचे आमदार आहेत.. त्यामुळे नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्यांचा आमनासामना हा होतच असतो..कोरोना आढावा बैठक असेल, मतदार संघातील कामं असतील, अशा वेगवेगळ्या कारणावरून हे दोन्ही नेते समोरासमोर येतच असतात.. त्यानंतर आता पुन्हा या दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.. आणि त्याला कारण ठरतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी..नेमकं काय घडलं? पाहुयात...