Next

BJPच्या कथित कार्यकर्त्याला कोर्टाबाहेर शाई का फासली? Lakhoba Lokhandeआहे तरी कोण? Pune News

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 15:04 IST2021-09-21T15:04:11+5:302021-09-21T15:04:40+5:30

सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवत समाजात तेढ निर्माण करण्याचे अनेक किस्से, बातम्या तुम्ही ऐकल्या असालंच. अशाच एक घटनेसंदर्भात पुण्यात तक्रार दाखल झालीये. मात्र ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. त्याचं झालं असं की लखोबा लोखंडे या नावानं एक व्यक्ती ट्विटर अकाउंट चालवत होता. या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्याविषयी अतिशय गलिच्छ शब्दात, समाजात तेढ निर्माण होईल अशा आशयाचं लिखाण केलं. त्याच्या सारखीच पातळी सोडून लिखाण करणारी मंडळीही त्याच्या अकाउंटला फॉलोअर्स म्हणून साडेतेरा हजार होते.