Next

ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीवची चर्चा सुरु कुठून झाली? Rituraj Gaikwad Sayali Sanjeev RELATIONSHIP

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:32 AM2021-10-20T11:32:03+5:302021-10-20T11:32:22+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सध्या खूप चर्चेत येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या काही महिनांपासून तिचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे. सायलीच्या इंस्टाग्रामवरील फोटोवर ऋतुराजने कमेंट केल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. तेव्हापासून सायलीच्या कोणत्याही पोस्टवर ऋतुराज गायकवाड शी संबधीत कमेंट केली जात आहे. दरम्यान सायली संजीवने इंस्टाग्रामवर नुकतेच साडीतील व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.