Next

'असली' भाडोत्री लोक भाजपला लागतातच', शिवसेनेच्या टीकेला राणे उत्तर काय देणार? Rane VS Shiv Sena

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:33 IST2022-01-04T14:32:31+5:302022-01-04T14:33:05+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या.. निकाल जाहीर झाला.. भारतीय जनता पक्षाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने या निवडणुकीत 11 जागा जिंकत वर्चस्व मिळवले.. तत्पूर्वी महाविकासआघाडीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची करत जोरदार प्रचार केला होता.. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः सिंधुदुर्गात प्रचारासाठी गेले होते.. निवडणूक अटीतटीची झाली आणि 19 पैकी 11 जागांवर भाजप पुरस्कृत पॅनेलला तर आठ जागांवर शिवसेनेसह महाविकास आघाडीला यश झाले.. निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर कठोर भाषेत टीकास्त्र सोडलं..एरवी नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर न देणाऱ्या शिवसेनेनं मात्र या वेळेस आपलं मौन सोडलं आणि नारायण राणे सोबतच भाजपवर देखील निशाना साधला...