संजय राऊत-चंद्रकांत पाटलांनी एकमेकांचे फोटो ट्विट करत काय म्हटलं? Chandrakant Patil vs Sanjay Raut
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:50 IST2022-01-19T17:49:42+5:302022-01-19T17:50:10+5:30
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकर निवडणुकीला उभे राहिल्यास कोणीही त्यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये असं सांगत पाठिंबा दर्शवला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना टोला लगावला. उत्पल पर्रीकर यांना पाठिंब्याची चर्चा करण्यापेक्षा हिंमत असेल तर संजय राऊत यांनी स्वत: गोवा विधानसभा निवडणुकीला उभे राहावे, असं आव्हान त्यांनी दिलं. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी ट्विट करुन उत्तर दिलं...