"फडणवीसांचं वजन, आव्हाडांना रोग" काय आहे वाद? Devendra Fadnavis vs Jitendra Awhad | Maharashtra
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 00:02 IST2021-04-05T00:02:09+5:302021-04-05T00:02:30+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलाच वाद रंगलाय... या वादाला सुरुवात झाली ती परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणापासून. पण आता मुख्यमंत्र्याच्या कालच्या भाषणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलय. काल मुख्यमंत्र्यांनी जगभरातील काही देशांमधील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केल. कुठे कुठे लॉकडाऊन असल्याची माहिती दिली. विरोधकांना चिमटेही काढले. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर देत त्याच देशांनी लॉकडाऊन करताना काय उपाययोजना केल्या, किती पैसे दिले याची माहिती दिली. तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत... आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची... असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.