Next

वाझेचा नवा प्रताप, Parambir Singh यांच्यानंतर अनिल देशमुखांशी कुजबूज; आयोगानं हटकलं Sachin Waze

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 16:13 IST2021-12-01T16:12:18+5:302021-12-01T16:13:14+5:30

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेची चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरु आहे. आता या चौकशीत वाझे दररोज नवनवीन प्रताप करतोय. म्हणजे एकीकडे वाझे चौकशीत गंभीर आरोप करतोय, दुसरीकडे चौकशीला येणाऱ्या अनेकांना भेटायचा प्रयत्न करतोय. सोमवारी वाझे परमबीर सिंह यांना गुपचूप जाऊन भेटला, त्यानंतर मंगळवारी अनिल देशमुखांशी आयोगासमोरच बोलायचा तो प्रयत्न करायला लागला, कुजबूज करायला लागला. मग आयोगालाच वाझेला हटकावं लागलं तेव्हा तो शांत बसला.