राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची फरफट होतेय? Shivajirao Adhalrao Patil-पाटलांचं धक्कादाक विधान ऐकाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 13:39 IST2022-01-04T13:39:29+5:302022-01-04T13:39:58+5:30
मविआ सरकारला नुकतीच २ वर्ष पूर् झाली, मविआ सरकार ५ वर्ष चालेल असं राज्यातले नेते सांगत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र प्रचंड अस्वस्थता आहे. ज्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेना पुणे ग्रामीणमध्ये रुजवली, वाढवली त्यांच्यावरच शिवसेना संपवू नका, शिवसैनिकाला मारु नका अशी विनंती करायची वेळ आलीय. खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनाच त्यांनी आर्जव केलंय. पण आढळराव पाटलांसारखा फायब्रँड आक्रमक नेता इतका नरमला, शिवसेनेच्या आक्रमक नेत्यावर राष्ट्रवादीकडे साकडं घालायची वेळ का आली, आढळराव पाटील असं का म्हणाले, राष्ट्रवादीमुळे शिवसैनिकांची फरफट होतेय का?