Next

राष्ट्रवादीकडून जाहीर कार्यक्रमातच भाजप आमदाराला ऑफर, पहा पुढे काय घडलं? Ajit Pawar | Jaykumar Gore

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:18 PM2022-01-03T14:18:21+5:302022-01-03T14:18:47+5:30

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कामाची शैली सर्वांनाच परिचित आहे.. त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच माहिती आहे.. एखादी व्यक्ती चुकल्यानंतर चार माणसातही त्याला दोन गोष्टी सूनावताना ते मागे पुढे पाहत नाहीत.. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता, कामाचा झपाटा या सर्व बाबींमुळे राष्ट्रवादीसह मित्र पक्षात आणि विरोधी पक्षातही त्यांचे अनेक चाहते आहेत.. फक्त सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकारण्यांमध्येही त्यांची एक वेगळी छाप आहे याचा प्रत्यय अनेकदा आलाय.. "मी तर अजितदादांचा फॅन" जाहीर सभेत भाजप आमदाराची कबुली.