Raj Thackeray Sabha : व्हिडिओतून कुणाची पोलखोल | काश्मीरमध्ये सभा लाईव्ह दाखवणार | Lav Re To Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:44 IST2022-04-12T15:43:10+5:302022-04-12T15:44:33+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ठाण्यात उत्तर सभा आज पार पडणार आहे.. सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर या सभेतून राज ठाकरे घणाघाती हल्ला करणार असे संकेत मिळतायत... त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलय... गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा उचलला होता...त्यावरुन बराच गदारोळ झाला... राज ठाकरेंच्या स्वपक्षातील नेत्यांमध्ये ही यावरुन खलबतं झाली...याच विषयावरुन सुद्धा राज ठाकरे या सभेत विस्ताराने भूमिका मांडणार असल्याचं कळतय.. आता राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्यावर त्यांना देशातून प्रतिसाद मिळतोय.. सोशल मीडियावर राज ठाकरे ट्रेंडिंगला आहेत... त्यामुळे राज ठाकरेंची सभा वेगवेगळ्या ठिकाणी लाईव्ह दाखवणार असल्याचं कळतय... नेमकी ही सभा कुठे लाईव्ह दाखवणार आणि त्यामागे नेमकं कारण काय... हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा... shailaja jogal vo #Rajthackeray #MNSsabha #Thane #Kashmirlive #Uttarsabha #Maharashtra #Jammukashmir #PMMModi #Rajthackeraysabha #Rajthackeraylive #Rajthackerayspeech