दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही,Kangana ranaut targets Mahatma Gandhi controversy
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 15:09 IST2021-11-18T15:09:16+5:302021-11-18T15:09:34+5:30
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते भीक होती. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं लाज आणणारं विधान ड्राम क्विन कंगना रणौतनं केलं. कंगनाच्या या बरळण्यानंतर तिच्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र, तरीही कंगना थांबलेली नाही. आता कंगनानं महात्मा गांधींविषयी चीड आणणारं विधान केलंय. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही. दुसरा गाल पुढे केल्यानं भिक मिळते, स्वातंत्र्य मिळत नाही, असं कंगनानं म्हटलंय. आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कंगनानं गांधीजींचा अपमान केलाय, एका वृत्तपत्राची कात्रणंही कंगनानं शेअर केलीयेत, पाहुयात आता कंगनानं काय मुक्ताफळं उधळलीयेत.