Next

नवाब मलिक, नितेश राणेंच्या ट्विटने महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली? Nitesh Rane VS Nawab Malik

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 02:25 PM2021-12-27T14:25:45+5:302021-12-27T14:26:08+5:30

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी Nitesh Rane आणि भाजपचे इतर आमदार सभागृहाच्या पायरीवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते.. त्याचवेळी Aditya Thakeray हे शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह विधानसभेत जायला निघाले.. आदित्य ठाकरेंना पाहताच नितेश राणे यांनी म्याव..म्याव..म्याव..म्याव..करत घोषणा दिल्या आणि आदित्य ठाकरेंना डिवचले.. या सर्व प्रकारानंतर नितेश राणे यांच्यासह भाजपचे काही नेते हसत राहिले.. नितेश राणे यांच्या कृतीने शिवसेना आणि राणे कुटुंबीयात जुंपली.. शिवसेनेचा वेगवेगळ्या नेत्यांकडून यावर संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते Nawab Malik यांनी या प्रकरणात उडी घेतली. एका कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केलेला फोटो नवाब मलिकांनी ट्विट केला आणि त्याला पैचान कोन? असं शीर्षक दिलं.. त्यांच्या या टीकेचा रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे हे मात्र स्पष्ट होत नव्हते.. परंतु नेटक-यानी मात्र त्या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.. तर काहींनी या ट्विटचा रोख Sameer Wankhede यांच्या दिशेनं असल्याचा निष्कर्ष देखील काढला आहे... (Ashvin VO) mla nitesh rane criticizes minority minister nawab malik