पत्रकार परिषद माझी, प्रश्न मलाच विचारा, फडणवीसांनी दादांना बोलूच दिलं नाही...पाहा Devendra Fadnavis
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:55 IST2022-03-03T16:55:39+5:302022-03-03T16:55:55+5:30
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची धामधूम सुरु झालीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या १७० मोहऱ्यांना चेकमेट करायला भाजप सज्ज झालीय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांची पत्रकार परिषद घेतली. त्यातला एक छोटासा किस्सा आता व्हायरल होतोय. त्याचं झालं असं की देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत होते. तेव्हा एका पत्रकारानं चंद्रकांतदादांनाच प्रश्न विचारला. पण प्रश्न पूर्ण होण्याआधीच फडणवीसांनी त्या पत्रकाराला अडवलं आणि माझी पत्रकार परिषद आहे, मला प्रश्न विचारा असं सांगितलं. पत्रकार प्रश्न विचारत राहिला पण फडणवीसांनी हिंदीतून मुझे पुझिये, प्रेस मेरी हैं असं म्हटलं. फडणवीसांच्या स्टँडमुळे उत्तर देण्यासाठी सरसावलेले दादा तिथेच स्तब्ध झाले.aniket vo #lokmat #Devendrafadnavis #Uddhavthcakeray #Chandrakantpatil