Next

प्रियंका चतुर्वेदी यांनी लक्ष वेधलं ते Bulli Bai GitHub प्रकरण आहे काय? ShivSena Priyanka Chaturvedi

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:06 PM2022-01-03T14:06:19+5:302022-01-03T14:06:44+5:30

एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत आहे. मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली आहे, मात्र ते दखल घेत नसल्याचा आरोपही प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय...