Next

स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर आमदार कसे निवडतात? Maharashtra Legislature | MLA Election

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 02:14 PM2021-11-16T14:14:37+5:302021-11-16T14:15:04+5:30

आमदार (MLA) कोण होणार? हे कोण ठरवतं असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही म्हणाल की, मतदार ठरवतात. जनतेच्या मतांवर आमदार, खासदार निवडले जातात.. हे सर्वांनाच माहितेय. देशातील काही राज्यात विधानपरिषद अस्तित्वात असल्याने त्या ठिकाणीही काही आमदार हे निवडून जातात हेही अनेकांना माहितेय.. काहींची निवड ही थेट विधानसभेचे सदस्य करतात तर काहींची निवड ही वेगवेगळ्या पद्धतीने होते.. त्यात शिक्षक, पदवीधर, राज्यपाल नियुक्त असे अनेक प्रकार आहेत. शिक्षक, पदवीधर मतदार हे आपला प्रतिनिधी विधानपरिषदेवर पाठवतात. त्याची निवडणूक होते आणि प्रचारही होतो. त्यात पात्र असलेले सर्वसामान्य लोकही आपलं मतं देऊ शकतात.. पण विधानपरिषदेवर काही आमदार असे निवडून जातात.. त्यांना विजयी होण्यासाठी नगरसेवक, जि.प.सदस्यांची मतं मिळवावी लागतात.. स्थानिक स्वराज्य संस्थेतून हे आमदार निवडले जातात.. त्यासाठी मतदार असतात त्या मतदारसंघात येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिकेचे नगरसेवक, जि,प सदस्य. त्यामुळे सर्वात जास्त घोडेबाजार कोणत्या निवडणुकीत होत असेल तर तो स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जाणाऱ्या आमदारांच्या निवडणुकीत..

 

Get Latest Updates in Messenger
टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसUddhav ThackerayDevendra Fadnavis