Next

देवेंद्र फडणवीस यांनी त्या चुकीची कबुली दिली? Devendra Fadanvis | Uddhav Thackeray | Shiv Sena | BJP

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 02:12 PM2021-11-16T14:12:51+5:302021-11-16T14:13:28+5:30

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणं ही फडणवीसांची चूक आहे का? आणि मूळात सध्याचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चूक कबूल केलेय का? हे प्रश्न का आणि कुठून आले, तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी तसा दावा केला... आणि त्यातूनच या चर्चा सुरु झाल्यात... गोखलेंनी जो दावा केलाय... त्याच्या पलिकडे जाऊन, आपल्याला यावर बोलायला हवं, की भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाकारलं असेल, तर भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय चुकीचा होता का? तुम्हीही यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा... आपण आधी या नव्या वादावर थोडं सविस्तर बोलू... नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही लोकमत पाहताय... तर विक्रम गोखले दखल घेण्याजोगं नेमकं काय म्हणाले हे आधी नीट समजून घेऊ...