हेमांगी कवी या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे Hemangi Kavi troll again after Facebook post
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 13:47 IST2021-10-20T13:47:20+5:302021-10-20T13:47:43+5:30
मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही तिच्या रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमी सक्रिय असते. तिच्या पेहरावावरुन ती ट्रोल होते आणि ती ट्रोलर्संना उत्तरही देते. काही दिवसांपूर्वी हेमांगीने सोशल मीडियावर लिहिलेली 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही पोस्ट चांगचील व्हायरल झाली होती. ती पोस्ट काही व्यक्तींना खटकली होती. तर काही व्यक्तींनी हेमांगीचे कौतुक केले होते. स्त्रियांनी ब्रा घालावी का? यासंदर्भातली ती पोस्ट होती. त्यानंतर हेमांगी आता पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.