Next

रिपाइं असताना मनसेची गरज काय?, आठवलेंचा सल्ला | Ramdas Athawale Latest Statement | MNS | RPI

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 11:21 AM2021-10-21T11:21:11+5:302021-10-21T11:21:57+5:30

रिपाइं असताना मनसेची गरज काय?, आठवलेंचा सल्ला | Ramdas Athawale Latest Statement | MNS | RPI त्या फेब्रुवारीमध्ये पुणे महानगरपालिकेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चार प्रमुख पक्ष असले तरी यांच्यात युती/आघाडी होणार की हे पक्ष स्वतंत्रपणे लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागले.. परंतु असं असलं तरीही मागील काही दिवसांपासून भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा जोर धरू लागल्या.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी बंद दाराआड चर्चादेखील झाली. या दोन पक्षात युतीच्या चर्चा जरी असल्या तरीही ठोस निर्णय मात्र झाला नाही.. अशातच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने मात्र भाजप मनसे युतीला विरोध केलाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र भाजप मनसे युतीला विरोध दर्शवलाय. आरपीआय सोबत असताना भाजपला मनसेची गरजच काय असे सांगताना मनसेसोबत युती झाल्यास भाजपला नुकसान होईल असा इशारा दिलाय..रामदास आठवले काय म्हणाले पाहुयात..