Next

आधी गळती आता उमेदवारच मिळेना...फडणवीस कोंडी कशी फोडणार?Goa Election | Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:44 PM2022-01-18T14:44:47+5:302022-01-18T14:45:03+5:30

उत्तरप्रदेशसह गोवा निवडणुकीची रणधुमाळीही सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपनं गोव्याचं प्रभारीपद दिलंय, पण गोव्यात काहीच आलबेल नाही. कारण अवघ्या पंधरा दिवसात चार आमदारांनी राजीनामा दिलाय, डझनभर भाजपचे नेते काँग्रेस-तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेत. फडणवीस भाजपच्या बाजूनं एक डाव टाकतात पण तोच त्यांना घेरायला आणखी चार डाव टाकले जातात. आधी नाराजी मग भाजपला लागलेली गळती, ५ वर्ष सत्ता भोगलेल्या मंत्र्यांचे राजीनामे यामुळे फडणवीस घेरले गेलेत. आता हे कमी होतं म्हणून की काय गोव्यात भाजपला उमेदवारच मिळत नाहीयेत. जे इच्छुक आहेत त्यांना तिकीट देता येणार नाही असं फडणवीस म्हणतायत. आता हा घोळ नेमका काय आहे, कुठे कुठे भाजपला जिंकून येईल असा उमेदवार मिळत नाहीये, फडणवीसांचे डावपेच का फेल जातायंत यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण त्याआधी पाहुयात गोव्यात आतापर्यंत भाजपला कशी गळती लागलीय ते.