Next

देवेंद्र फडणवीस उत्पल पर्रिकरांचं बंड कसं थोपवणार? Devendra Fadanvis | Utpal Parrikar | Goa Election

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:45 PM2022-01-18T14:45:57+5:302022-01-18T14:46:19+5:30

Devendra Fadanvis | Utpal Parrikar | Goa Election 2022 : गोव्यात भाजपचं सरकार आहे.. आणि हे सरकार पुन्हा सत्तेत आणणं हेच एकमेव आव्हान भाजपसमोर काही दिवसांपर्यंत होतं.. आणि आता गोवा भाजपसमोर आव्हानांची रांग लागलेय... महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे गोव्याचे निवडणूक प्रभारी आहेत... गेले काही दिवस फडणवीस गोव्यात मुक्काम ठोकून आहेत.. पण या दरम्यान भाजपला उतरती कळा लागल्याचं दिसतंय.. आणि त्यामुळेच केवळ सत्ता पुन्हा मिळवण्याचं आव्हान आता उरलं नाहीये.. पक्षाला लागलली गळती थांबवायचेय... विरोधकांना थोपवायचंय... आणि दुसरीकडे पक्षांतर्गत फुटीमुळे होऊ शकणारी संभाव्य नामुष्की टाळायचेय... आता फडणवीसांना या सगळ्यातून मार्ग काढावा लागणार आहे.. पण या सगळ्या आव्हानांमध्ये पर्रिकरांमुळे निर्माण झालेलं आव्हान आणि पेच मोठा आहे... त्यातच आता शिवसेनेने सुद्धा यात आपली भूमिका मांडलेय... त्यामुळे फडणवीसांसमोर उभ्या राहिलेल्या या आव्हानाविषयी सविस्तर बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...