मास्क घालू नका, सामाजिक अंतराचे पालन करू नका.. या डॉक्टरच्याव्हायरल व्हिडिओची सत्यता काय? Mumbai
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 14:46 IST2022-01-10T14:46:22+5:302022-01-10T14:46:59+5:30
देशात ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या फैलावाने भीतीचे वातावरण असताना मास्क घालू नका, सामाजिक अंतराचे पालन करू नका, असा संदेश देणाऱ्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे. या व्हिडिओतील डॉक्टर हे मुंबईतील नायर रूग्णालयातील अधिष्ठाता आहेत असं त्यात लिहलं आहे.मात्र संबंधित व्हिडिओ आपला नसल्याचा उलगडा खुद्द नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे. काय आहे व्हायरल व्हिडिओ आणि त्यावर काय आहे सत्यता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत...