Next

"तेव्हाच कोरोना येतो का?, इतरवेळी कुठे जातो" | Coronavirus In Mumbai | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 09:25 AM2021-08-04T09:25:56+5:302021-08-04T09:26:23+5:30

चार आण्यांची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला ही म्हण सध्या मुंबईकरांसाठी तंतोतंत लागू होतेय.. याच कारण आहे ती मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन बंद असल्याने अनेकांना कामावर जाण्यासाठी इतर पर्याय वापरावे लागताय. कोणी बसने जातोय.. कोणी रिक्षा-टॅक्सी-कॅबने.. तर कोणी स्वतःचं वाहन घेऊन.. यातील अनेकांना जितका पगार आहे. त्यातील अर्धे पैसे तर प्रवासातच जातायत. पैट्रोल महागल्याने प्रवास खर्चही वाढलाय.. बसमध्ये चढू दिलं जातं नाही. अशात मुंबईकरांना आठवतेय ती लोकल ट्रेन.. लोकल लवकर सुरु करा. अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.