अमित शाह समोरच गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुद्ध | Chandrakant Patil vs Girish Bapat
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 14:47 IST2021-12-21T14:47:24+5:302021-12-21T14:47:57+5:30
केंद्रीय मंत्री अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर होते.. दिवसभरात त्यांनी पाच वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली.. परंतु सुरुवातीच्या तीन कार्यक्रमात भाजपचे पुण्यातील प्रमुख नेते असलेले खासदार गिरीश बापट मात्र कुठेही दिसले नव्हते.. गिरीश बापट यांच्या निवासस्थानापासून जवळच असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला देखील शहा यांनी भेट दिली.. परंतु पुण्यात असलेले गिरीश बापट त्याठिकाणीही दिसले नाहीत..शाह यांचा दौऱ्यादरम्यान डावलले गेल्याने ते नाराज असल्याच्याही चर्चा होत्या.. त्यानंतर मात्र स्वतः अमित शहा यांनी बापट कुठे आहेत अशी विचारणा केली आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली..खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच हा किस्सा सांगितला...