Next

राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता | Heavy Rain In Maharashtra | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 02:48 PM2020-10-15T14:48:16+5:302020-10-15T14:48:41+5:30

बंगालच्या उपसागरातून आंध्रप्रदेश मध्ये जमिनीवर आलेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणजेच डिप डिप्रेशन बुधवारी संध्याकाळी दक्षिण मध्य महाराष्ट्र पर्यंत पोहोचले आणि या क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारी दुपारपासून पावसाची धुवाधार बॅटिंग झाली अनेक ठिकाणी अतिवृष्टी काही घटना घडल्या तर हेच कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी आणि शुक्रवारी सुद्धा कायम राहणार आहे आणि त्यामुळेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शुक्रवारी म्हणजे उद्या सकाळी हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता असून त्याची तीव्रता वाढत जाण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने १५ आॅक्टोबरला रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात आॅरेंज अलर्ट १५ आॅक्टोबर रोजी धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, गडचिरोली, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकाडाटासह पावसाची शक्यता आहे़ १६ आक्टोबर रोजी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात आरेज अलर्ट देण्यात आला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :महाराष्ट्रपाऊसमानसून स्पेशलMaharashtraRainMonsoon Special