बिपीन रावतांचे निधन, हेलिकॉप्टरला कोसळताच भीषण आग CDS Bipin Rawat Chopper Crash
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 14:54 IST2021-12-09T14:53:36+5:302021-12-09T14:54:02+5:30
भारताच्या संरक्षण खात्यातील सर्वात महत्वाचे व्यक्ती असलेले सीडीएस बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटननेत निधन झालं. संरक्षण खात्याच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याचा बळी घेणारी इतिहासातील ही पहिलीच मोठी दुर्घटना मानली जाते. तामिळनाडूच्या कुन्नूरमधील निलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी यांच्यासह १२ जणांचे निधन झालं. हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास करत होते. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुपारी साडे बाराच्या सुमारास कुन्नूरमध्ये कोसळलं.