इंडोनेशिया त्सुनामी : पाहा अजस्त्र लाटांनी माजवलेला उत्पात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 21:37 IST2018-09-29T21:36:28+5:302018-09-29T21:37:33+5:30
इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) 7.5 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स खात्याने याबाबत माहिती दिली होती. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.