भारतपुत्र मनोज कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 18:50 IST2016-07-24T13:20:03+5:302016-07-24T18:50:03+5:30
बॉलीवूडमधील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार (हरीकिशन गिरी गोस्वामी) यांचा २४ जुलै रोजी वाढदिवस. त्यांचे हिमालय की गोद मे, उपकार, दो बदन, हरियाली और रास्ता, पत्थर के सनम, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, क्रांती हे चित्रपट गाजले. त्यांच्या चित्रपटातील काही निवडक गाणी.
बॉलीवूडमधील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार (हरीकिशन गिरी गोस्वामी) यांचा २४ जुलै रोजी वाढदिवस. त्यांचे हिमालय की गोद मे, उपकार, दो बदन, हरियाली और रास्ता, पत्थर के सनम, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, क्रांती हे चित्रपट गाजले. त्यांच्या चित्रपटातील काही निवडक गाणी.उपकार चित्रपटातील मेरे देश की धरती हे गाणं आजही लोकांना स्फूर्ती देते.क्रांती चित्रपटातील क्रांती क्रांती हे गाणे चेतना देण्यासाठी ओळखले जाते.पूरब और पश्चिम चित्रपटातील भारत का रहनेवाला हुँ आजही लोकांना अभिमानास्पद वाटते.रोटी कपडा और मकान चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले मै ना भुलुंगा हे गाणं खूप गाजले.पूरब और पश्चिम चित्रपटातील कोई जब तुम्हारा हृदय तोड दे हे मुकेश यांचे गाणे प्रेमवीरांच्या डोळ्यात पाणी आणते.पूरब और पश्चिम चित्रपटातील दुल्हन चली हे गाणे खूप गाजले.क्रांती चित्रपटातील महेंद्र कपूर यांनी गायलेले अब के बरस हे गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे.शोर चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले इक प्यार का नगमा है गाणे लोकांना अजूनही आवडतेक्रांती चित्रपटातील हे गाणं लोकांच्या मनावर रुंजी घालते.दो बदन चित्रपटातील भरी दुनिया मे आखिर हे मोहम्मद रफी यांनी गायलेले गाणं लोकांना खूप आवडते.