जायकवाडी धरण 95 टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 13:47 IST2017-09-22T13:45:29+5:302017-09-22T13:47:19+5:30
औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्के भरले आहे. धरणातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी (21 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास तातडीने ...
औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्के भरले आहे. धरणातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी (21 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी धरणाची 18 दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याचा हा विसर्ग पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, धरण परिसरात येण्यास पोलिसांकडून नागरिकांनी मनाई करण्यात आली आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत आहे.