Next

भरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 02:56 PM2019-01-23T14:56:35+5:302019-01-23T15:09:58+5:30

बार्शीटाकळी ( अकोला ) : भरधाव जात असलेल्या लक्झरी बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात ...

बार्शीटाकळी ( अकोला ) : भरधाव जात असलेल्या लक्झरी बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. अकोला ते मंगरुळपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)जवळ बुधवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास हा अपघात झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लक्झरी बसची तोडफोड करून ती पेटवून दिली.