कारंजा ते अमरावती मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:24 IST2018-11-30T17:24:03+5:302018-11-30T17:24:54+5:30
कारंजा लाड : रोही आडवा आल्याने दुचाकीला अपघात होवून त्यात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान कारंजा ते अमरावती मार्गावरील वाल्हई फाट्यानजीक घडली.

कारंजा ते अमरावती मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : रोही आडवा आल्याने दुचाकीला अपघात होवून त्यात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान कारंजा ते अमरावती मार्गावरील वाल्हई फाट्यानजीक घडली.
मालेगाव तालुक्यातील वाल्हई येथील बन्सीराम राठोड (५०) वर्ष हे आपल्या एम.एच.३७, ९५५६ क्रमांकाच्या दुचाकीने मुर्तिजापुरकडे जात असतांना अचानक रोही आडवा आल्याने दुचाकीला अपघात झाला. यामध्ये बन्सीराम राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक बन्सीराम राठोड हे बिबे विकण्याचा व्यवसाय करीत होते. त्यामुळे ते बिबे घेवून मुर्तिजापुर येथे बाजारात जात असतांना हा अपघात घडल्याचे घटनास्थळावरील उपस्थितांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बंडु चेतुरकर हे रूग्णवाहिका घेवून घटनास्थळी पोहचले. राठोड यांना कारंजा उपजिल्हा रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी कारंजा शहर पोलीसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.