शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

युवकच बनले शिक्षक अन विद्यार्थी; स्पर्धा परीक्षेचे धडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 6:01 PM

वाशिम शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन स्थानिक शिवाजी विद्यालयात स्टडी सर्कल गु्रपची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देयुवक एकत्र आले आणि त्यांनी शिवाजी स्टडी सर्कल ग्रूूपची स्थापना केली. येथे युवकच विद्यार्थी व शिक्षकाची भूमिका निभावतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  निराशेच्या गर्तेतून बाहेर येत आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर यशाचे गाव गाठण्यासाठी वाशिम शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन स्थानिक शिवाजी विद्यालयात स्टडी सर्कल गु्रपची स्थापना केली आहे. येथे युवकच विद्यार्थी व शिक्षक बनून स्वत:चे ‘करिअर’ उज्ज्वल करीत आहेत.प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण होत आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थी जीवाचे रान करीत आहेत. काही विद्यार्थी व युवकांना उज्वल करिअर घडविण्यासाठी योग्य दिशा मिळत आहे तर काही विद्यार्थी मार्गदर्शन व दिशाविना दिशाहीन होत असल्याचे दिसून येते. गुणवंत असूनही योग्य मार्गदर्शन नसल्याने अनेक युवकांना मनासारखे पद व क्षेत्र मिळत नाही. ही उणीव दूर करण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम शहरात काही युवक एकत्र आले आणि त्यांनी शिवाजी स्टडी सर्कल ग्रूूपची स्थापना केली. येथे युवकच विद्यार्थी व शिक्षकाची भूमिका निभावतात. स्वयंप्रेरणेतून युवक एकत्र येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. निराशेची धूळ झटकून आशावादी बना आणि आपले स्वप्न साकारण्यासाठी मेहनतीचा मार्गावरून चला, असा संदेश शिवाजी स्टडी सर्कल ग्रूूपचे युवक इतर युवकांना देत आहेत. कष्टाला अंत नसतो अन् महत्त्वाकांक्षेला मरण नसते, यावर विश्वास ठेवून या ग्रूूपमधील युवकांची वाटचाल सुरू आहे. यामधील अनेक युवक प्रशासकीय सेवेतील वर्ग एक व दोनच्या महत्त्वाच्या पदावर विराजमान झाले आहेत. या ग्रूूपमधील युवक स्वत:च शिक्षक, मार्गदर्शक व विद्यार्थी आहेत. शिक्षण होऊनही काही पदरी पडत नसल्याची मानसिकता बनलेल्या युवकांसाठी हा ग्रूूप आशेचा किरण देणारा ठरत आहे. याच ग्रूूपमध्ये अभ्यास करून योगेश निरगुडे या ध्येयवेड्या युवकाने युपीएससीच्या परीक्षेतून ‘आयएएस’ रँक मिळविली आहे. त्यांची मूळ पोस्टिंग गुजरात राज्यात आहे. या ग्रूपमधूनच उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल मेसरे, पोलीस उपअधीक्षक सुनील लोखंडे, तहसिलदार बळवंत अरखराव, तहसीलदार राजेश वजिरे, नायब तहसीलदार नीलेश मडके, विक्रीकर अधिकारी विलास सारस्कर, नगर परिषद मुख्याधिकारी दीपक इंगोले, विजय सरनाईक, सुनील बल्लाळ, गजानन भोयर यांच्यासह अनेक युवकांनी यश मिळविले आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक