मोठ्या भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने धाकट्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 08:23 IST2021-06-28T08:22:42+5:302021-06-28T08:23:04+5:30
उपचार घेत असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर या दोन भावांमधील प्रेम पाहून गावातील तिसऱ्याही व्यक्तीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले

मोठ्या भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने धाकट्याचा मृत्यू
दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उपचार घेत असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर या दोन भावांमधील प्रेम पाहून गावातील तिसऱ्याही व्यक्तीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मानोरा तालुक्यातील सोयजना येथे रविवारी ही घटना घडली. सोयजना येथील जनार्दन सीताराम पवार (७५) यांचे पार्थिव घरी आणले असता ते पाहून लहान बंधू मुरलीधर सीताराम पवार (७०) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मित्राचेही निधन
जनार्दन पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पाडून घरी परतल्यानंतर या दोन भावांचे प्रेम पाहून गावातील धनुर्धर लक्ष्मण कोल्हे (५५) हेही भारावले आणि त्यांनाही हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचेही निधन झाले. अवघ्या अर्ध्या तासात हे घडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्याची संधीही मिळाली नाही. एकाच दिवशी गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली होती.