लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:36 IST2020-08-01T11:35:36+5:302020-08-01T11:36:02+5:30

दीक्षा हिचे चांधई येथील वैभव संजय ठाकरे याच्याशी प्रेमसंबंध होते. परंतु २५ जुलै रोजी त्याने लग्नास नकार दिल्याने दिक्षाने विषारी औषध प्राशन केले

Young woman commits suicide after refusal to marry | लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : गावातील युवकाने लग्नास नकार दिल्याने विषारी औषध प्राशन करुन वीस वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपिविरुध्द गुन्हा दाखल केला .
तालुक्यातील चांधई येथील ताराबाई अर्जुन वानखडे (३८) या महिलेने दिेलेल्या तक्रारीनुसार, माझा पहिला विवाह डही येथील दिपक अवचार यांचेशी झाला होता .१५ वर्षांपूर्वी त्याच्याशी घटस्फोट झाला असून त्यांच्यापासून दीक्षा दिपक अवचार ही वीस वर्षीय मुलगी आहे. त्यानंतर मी दारव्हा येथील अर्जून वानखडे यांच्याशी विवाह केला आहे. माझ्या पहिल्या पतीपासून असलेली मुलगी दीक्षा हिचे चांधई येथील वैभव संजय ठाकरे याच्याशी प्रेमसंबंध होते. परंतु २५ जुलै रोजी त्याने लग्नास नकार दिल्याने दिक्षाने विषारी औषध प्राशन केले व २९ जुलै रोजी तिचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यास आरोपी वैभव ठाकरे जबाबदार आहे. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Young woman commits suicide after refusal to marry