शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम विधानसभा मतदार संघात कुठे सभ्रंम, कुठे ओढाताण

By admin | Updated: August 20, 2014 23:08 IST

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना वाशिम-मंगरुळपीर हय़ा राखीव मतदारसंघात काही पक्षात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मंगरुळपीर : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना वाशिम-मंगरुळपीर हय़ा राखीव मतदारसंघात काही पक्षात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत अद्याप जागा वाटपाचेच गुर्‍हाळ सुरु असून मनसे, भारिप - बसपा या पक्षाचे संभाव्य इच्छुक उमेदवार कोण आहेत हे जरी उघड होत नसले तरी इच्छुकांची गर्दी सर्वच पक्षात होतांना दिसून येत आहे. भाजपामध्ये इच्छुकांची मोठी संख्या असल्याने चांगली ओढाताण होताना दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षातील इच्छूक उमेदवारांनी आपापल्या परीने जनसंपर्क वाढविला आहे. सन २00९ साली परिसीमन आयोगाने केलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघ संपुष्टात येउन नव्याने वाशिम-मंगरुळपीर या मतदारसंघाची निर्मिती झाली. तसेच सदरचा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता राखीव झाला. २00९ च्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी भाजपाचा उमेदवार विजयी झाला. यानंतर सन २0१४ ची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. आचारसंहिता लागू व्हायला काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अनेक राजकीय पक्षांमध्ये शांतता दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपने मिळविलेल्या एकहाती विजयामुळे या भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी तेवढे सोपे सुध्दा नाही. काँग्रेस इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती मुंबई येथे पार पडल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप जागा वाटपाचीच चर्चा सुरु आहे. तसेच प्रसंगी स्वबळावर लढण्याच्या वल्गना दोन्ही काँग्रेसचे नेते करीत आहेत. याचबरोबर आघाडीत वाशिम हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असून काँग्रेसमध्येही इच्छूकांची संख्या मोठी आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा ठोकला असून राष्ट्रवादी कडे इच्छूक उमेदवार तयार आहेत. याचबरोबर मनसे, भारिप, भाजपा या पक्षांनीसुद्धा अद्याप त्यांचे उमेदवार घोषीत केले नसून या पक्षातील इच्छूकांची संख्या मात्र सर्वच पक्षात मोठी दिसून येत आहे.