शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बाप्पांचे स्वागत

By admin | Updated: September 18, 2015 00:20 IST

वाशिम जिल्ह्यात ६१३ गणेश मंडळांची स्थापना; जवळपास १७९ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’चा उपक्रम प्रत्यक्षात.

वाशिम : विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचे १७ सप्टेंबरला जिल्ह्यात मंगलमय वातावरण व जल्लोषात गणेशभक्तांनी स्वागत केले. वाशिम जिल्ह्यात ६१३ गणेश मंडळांची स्थापना झाली असून, यापैकी जवळपास १७९ गावांमध्ये ह्यएक गाव-एक गणपतीह्णचा उपक्रम प्रत्यक्षात साकारण्यात आला आहे. दरम्यान, बाप्पांच्या स्वागतासाठी पावसानेही दमदार हजेरी लावल्याने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणीत झाला. गुरूवारी सकाळपासूनच गणरायांची स्थापना करण्याची लगबग सुरू होती. वाशिम शहरातील नगर परिषद रोडस्थित असलेल्या बाजारपेठेतून गणेशभक्तांनी गणरायांच्या आकर्षक मूर्ती घेऊन वाजत-गाजत मिरवणूक काढली. पावसाच्या सरीत ओलेचिंब होत गणेशभक्त आनंदात जणू न्हावून निघाले. ह्यआला गणपती. आला गणपती. आज आपल्या दारी.. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या गाण्याच्या धूनमध्ये गणेशभक्तांनी गणरायांची स्थापना केली. जिल्ह्यात एकूण ६१३ गणेश मंडळांपैकी शहरी भागात ४१२ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. वाशिम शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक शहरात गणरायाचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक पर्वणी असते. पावसाचे पुनरागमन आणि गणरायाचे आगमन अशा दुहेरी संगमाचा आनंद गणेशभक्तांसह जिल्ह्यातील भाविकांनी लुटला. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा शहर व ग्रामीण भागात गणेशभक्तांनी गणरायांचे जल्लोष स्वागत केले.

*एक गाव- एक गणपतीचा उपक्रम

        गावात सामाजिक एकोपा कायम राहावा, तंटामुक्तीचे वारे वाहावे यासाठी एक गाव- एक गणपती हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील १७९ गणेश मंडळांनी सहभाग घेत एक गाव-एक गणपती ही संकल्पना साकारली आहे.