अवकाळीने नुकसान; बळीराजाने आठ एकरातील हरभऱ्यावर फिरविला ट्रॅक्टर
By संतोष वानखडे | Updated: December 11, 2023 15:18 IST2023-12-11T15:18:21+5:302023-12-11T15:18:57+5:30
हरभरा पिकाला शेतात जास्त पाणी साचणे सहन होत नाही.

अवकाळीने नुकसान; बळीराजाने आठ एकरातील हरभऱ्यावर फिरविला ट्रॅक्टर
वाशिम : अवकाळी पाउस, ढगाळ वातावरण, शेतात पाणी साचणे आदी कारणांमुळे हरभरा पीक जळून जात आहे. मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेतकरी नरेंद्र राऊत यांच्या शेतातील हरभरा जळत असल्याने सोमवारी (दि.११) त्यांनी आठ एकरातील हरभरा पिकावर ट्रॅक्टर फरविला.
हरभरा पिकाला शेतात जास्त पाणी साचणे सहन होत नाही. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. त्यानंतर ढगाळ वातावरणाने हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला, मर रोगही आला. यामुळे हरभरा पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. वनोजा येथील नरेंद्र राऊत यांच्या शेतात आठ एकर हरभरा पेरला होता. हरभऱ्यावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. उत्पादन येण्याची शक्यता नसल्याचे पाहून त्यांनी ८ एकर शेतातील हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरविला. पेरणीसाठी बियाणे, खत, पेरणी, मशागतीवर मोठा खर्च केला होता. मात्र, अवकाळी पावसाने सर्व हिरावून नेले असून, शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.