रिसोड तालुक्यातील २० गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 05:34 PM2021-05-25T17:34:36+5:302021-05-25T17:34:41+5:30

Risod Water scarcity News : तीन ठिकाणी बोअर व विहिर अधिग्रहण करण्यात आले तर करंजी गरड येथे टँकर सुरु करण्यात आले आहे.

Water scarcity in Risod Taluka | रिसोड तालुक्यातील २० गावांना पाणीटंचाईच्या झळा

रिसोड तालुक्यातील २० गावांना पाणीटंचाईच्या झळा

Next
ठळक मुद्देसालीपुरा प्रभागातील जलवाहिनीचा मुद्दा

रिसोड : रिसोड तालुक्यातील २० गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, तीन ठिकाणी बोअर व विहिर अधिग्रहण करण्यात आले तर करंजी गरड येथे टँकर सुरु करण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या सुरूवातीला रिसोड तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यातील करंजी गरड या गावाला दरवर्षी उन्हाळ्यात टंंकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदादेखील करंजी गरड येथे पाणीटंचाइ असल्याने टँकर सुरु करण्यात आले आहे. गत वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच परतीच्या पावसामुळे प्रकल्पात बºयापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी अनेक गावात पाणीटंचाईची तिव्रता देखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी ३४ पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली होती. जवळपास ४ ठिकाणी विहिर व बोअर अधिग्रहण केले होते तर एका ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिसºया आठवड्यात तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचा १० विहीरी व एक बोअर अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला आहे. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील

धोडप बु. ,लोणी बु, वडजी, पेनबोरी, देगाव, भोकरखेडा,वाडीरायताळ, गोवर्धन,सवड, येवती, मसलापेन, मांगुळ झनक,लोणी खु, आसोला, व्याड, शेलगाव राजगुरे, चाकोली, कवठा, गणेशपूर, पांचाबा या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय काही गावातील महिलांना शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावकºयांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतू, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. नळ योजना दुरूस्ती मध्ये
व्याड, शेलगाव, चाकोली, कवठा, गणेशपुर, पाचांबा ही गावे आहेत.

यावर्षी तहसिल कार्यालयात पाच तर पंचायत समिती कार्यालयात सात असे एकुण १२ गावातुन विहीर व बोअर अधिग्रहणा करीता प्रस्ताव आले आहेत.
तसेच गत वर्षी १३ मे पर्यंत करंजी गरड येथे टँकर सुरु होते. तर ३ विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले होते. 

रिसोड तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फारच कमी प्रमाणात पाणीटंचाई आहे. काही गावातील विहीर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर लवकरच तोडगा काढु तसेच करंजी गरड या गावात नियमित टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

- संतोष आष्टीकर
गटविकास अधिकारी, पं स रिसोड.

Web Title: Water scarcity in Risod Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.