वाशिममध्ये वरली अड्डय़ांवर धाड!

By Admin | Updated: April 11, 2017 02:34 IST2017-04-11T02:10:59+5:302017-04-11T02:34:50+5:30

पथकाने धाड टाकून रोख ४१00 रुपये जप्त

Waste to the bases in the yard! | वाशिममध्ये वरली अड्डय़ांवर धाड!

वाशिममध्ये वरली अड्डय़ांवर धाड!

वाशिम : शहरातील दोन ठिकाणी सुरू असलेल्या वरली अड्डय़ांवर स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी सोमवार, १0 एप्रिल रोजी धाड टाकून दोन आरोपींना अटक केली. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, शहरातील महात्मा फुले संकुल परिसरात सुरू असलेल्या वरली अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून रोख ४१00 रुपये जप्त करून आरोपी शे. नय्यूम शे. हुसेन यास अटक केली.
तसेच शहर पोलीस पथकाने श्रीराम टॉकीज परिसरात सुरू असलेल्या वरलीच्या अड्डय़ावर धाड टाकून वरली मटक्याच्या साहित्यासह १८00 रुपये रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी गजानन रामचंद्र पाटील या आरोपीस अटक करण्यात आली.

Web Title: Waste to the bases in the yard!