वाशिम : जऊळका-खिर्डा मार्गाच्या कडेला अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:27 IST2018-01-22T19:09:36+5:302018-01-22T19:27:33+5:30

जऊळका रेल्वे (वाशिम): जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील एका बाभूळ झाडाच्या काट्यांमध्ये अडकून असलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २२ जानेवारीला घडली.

Wasim: Unidentified body found near the Jouka-Khurda road! | वाशिम : जऊळका-खिर्डा मार्गाच्या कडेला अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला!

वाशिम : जऊळका-खिर्डा मार्गाच्या कडेला अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला!

ठळक मुद्देजऊळका-खिर्डा रोडवरील प्रकार: पोलिसांसमक्ष तपासाचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
जऊळका रेल्वे (वाशिम): जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील एका सुबाभळीच्या काट्यांमध्ये अडकून असलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २२ जानेवारीला घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील विठोबा मुळे यांच्या शेताच्या धुºयाला लागून असलेल्या बाभूळ झाडाच्या काट्यात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिस पाटील विजय सरोदे यांना खिर्डा येथील दिलीप चव्हाण यांनी दिली. त्यावरून घटनास्थळी जाऊन पाहिले असता, एक अनोळखी इसम मृतावस्थेत दिसून आला. त्याचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे असून त्याने अंगात निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट आणि पांढºया रंगाचे शर्ट घातलेले आहे. याप्रकरणी पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून जऊळका पोलिसांनी मर्ग दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरणकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आरसेवार व बीट जमादार विलास ताजणे करित आहेत. 

Web Title: Wasim: Unidentified body found near the Jouka-Khurda road!